नवी दिल्ली :फिनटेक फर्म (Fintech firm) BharatPe चे व्यवस्थापकीय संचालक अश्नीर ग्रोव्हर ( Ashneer Grover ) यांनी आगामी बोर्ड बैठकीचा अजेंडा मिळाल्यानंतर लगेचच आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. बोर्डाच्या बैठकीच्या अजेंड्यात त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचे PwC या सल्लागार कंपनीच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
"आगामी बोर्ड मीटिंगचा अजेंडा समजल्यावर अशनीर ग्रोव्हर यांनी भारतपेचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून राजीनामा दिल्याचे भारतपे कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे. अजेंड्यात PwC चा अहवाल सादर करणे आणि त्या आधारावर केलेल्या कारवाईचा विचार करणे याचा समावेश येतो. अहवालातील निष्कर्षांच्या आधारे कारवाई करण्याचे अधिकार मंडळाने राखून ठेवले आहेत.