सॅन फ्रान्सिस्को- कोविड-१९ चा जगभरात वेगाने प्रसार होत असताना अॅपलने मोठा निर्णय घेतला आहे. चीनबाहेर असणारे सर्व अॅपल स्टोअर २७ मार्चपर्यंत तात्पुरत्या काळासाठी बंद करण्याची घोषणा अॅपलचे सीईओ टीम कुक यांनी केली.
कोरोनाचे जगातील प्रमाण कमी होण्यासाठी १५ दशलक्ष डॉलरची मदत करणार असल्याचे टीम कुक यांनी जाहीर केले आहे. कोरोनाचा चीनमधील प्रभाव कमी होत असल्याने अॅपलने चीनमधील सर्व ४२ किरकोळ विक्री दुकाने सुरू केली आहेत. मात्र, स्पेन आणि इटलीमधील किरकोळ विक्री दुकाने (स्टोअर्स) अद्याप बंद आहेत.
ग्राहकांना सेवा देण्यासाठी बांधील असल्याचे टीम कुक यांनी म्हटले आहे, तर ऑनलाईन स्टोअर अथवा अॅप स्टोअर सुरू असल्याचेही कुक यांनी सांगितले. ग्राहकांनी इतर सेवा आणि मदतीसाठी अॅपलच्या वेबसाईटचे सहाय्य घेण्याचे त्यांनी आवाहन केले.
हेही वाचा-बंगळुरू : कोरोनाच्या भीतीने इन्फोसिसने बंगळुरूमधील इमारत केली रिकामी
कंपनीमधील लोक दूर राहून काम करू शकतात. कर्मचाऱ्यांनी मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे, असेही त्यांनी आवाहन केले. सर्व कार्यालयांमध्ये आरोग्य तपासण्या करण्यात येत असल्याची माहितीही अॅपलचे सीईओ टीम यांनी दिली आहे.