महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

अपोलो रुग्णालयाकडून हैदराबादमध्ये 'स्पूटनिक व्ही' देण्याकरिता नियोजन सुरू

कॉर्पोरेटच्या परिसरामध्ये लसीकरण सुरू करण्यासाठी चर्चा सुरू असल्याची माहितीही अपोलो रुग्णालयाकडून देण्यात आली. देशामध्ये ६० ठिकाणी लसीकरण सुरू करण्याचे प्रशासकीय नियोजन करण्यात येत असल्याचीही त्यांनी माहिती दिली.

Apollo Hospitals
अपोलो रुग्णालय

By

Published : May 17, 2021, 5:22 PM IST

नवी दिल्ली - अपोलो हॉस्पिटल्स आणि डॉ. रेड्डीज लॅबोरटरीज यांनी कोरोना लसीकरण कार्यक्रमासाठी स्पूटनिक व्हीबरोबर करार केला आहे. पहिल्या टप्प्यात हैदराबादमध्ये लसीकरण सुरू झआले आहे. तर १८ मे रोजी विशाखापट्टणम येथील रुग्णालयात लसीकरण घेण्यात आले. या लसीकरणासाठी कोविनवर नोंदणी आणि केंद्र सरकारच्या नियमांचे पालन करावे लागणार आहे.

अपोलो हॉस्पिटल्सचे अध्यश्र के. हरीप्रसाद म्हणाले, की प्रायोगिक टप्प्यात डॉ. रेड्डीज आणि अपोलो यांच्याकडून चाचणीसाठी व्यवस्था करण्यात येणार आहे. कोल्ड चेन लॉजिस्टिकसह लॉंचिंगची तयारी करण्यात येणार आहे. ही लस सहज उपलब्ध होण्साकरता महत्त्वाचे योगदान देण्यासाठी सक्षम आहोत.

हेही वाचा-होंडाकडून मोफत सेवेसह वॉरंटीमध्ये ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ

कॉर्पोरेट कंपन्यांच्या परिसरात लसीकरण करण्याचे प्रयत्न-

कॉर्पोरेटच्या परिसरामध्ये लसीकरण सुरू करण्यासाठी चर्चा सुरू असल्याची माहितीही प्रसाद यांनी दिली. देशामध्ये ६० ठिकाणी लसीकरण सुरू करण्याचे प्रशासकीय नियोजन करण्यात येत असल्याचीही त्यांनी माहिती दिली.

हेही वाचा-एनईएफटी सेवा २२ मे रोजी १४ तास राहणार बंद

स्पूटनिक व्ही देशातील पहिली कोरोना लस-

देशामध्ये स्पूटनिक व्ही लशीची आयात केलेली पहिली बॅच नुकतीच दाखल झाली आहे. हैदराबाद, विशाखापट्टणमनंतर दिल्ली, मुंबई, बंगळुरू, अहमदाबाद, चेन्नई, कोलकाता आणि पुण्यामध्ये लसीकरण करण्यात येणार आहे. रशियाच्या संस्थेने ऑगस्ट २०२० मध्ये तयार केलेली स्पूटनिक व्ही ही जगातील पहिली कोरोना लस आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details