महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

भाजपने वेबसाईटचे टेम्पलेट चोरले, आंध्रप्रदेशमधील स्टार्टअपचा आरोप - भाजप वेबसाईट

आपल्या आयटी टीमला टेम्पलेटच्या अटी वाचण्याविषयी सांगा. तसेच तुमच्या आयटी टीमचा ई-मेल द्या, त्यांच्याशी बोलू, असेही कंपनीने भाजपला उद्गेशून म्हटले आहे.

भाजप वेबसाईट

By

Published : Mar 25, 2019, 12:55 PM IST

नवी दिल्ली - हॅक झाल्याने चर्चेत आलेली भाजपची वेबसाईट पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. आंध्रप्रदेशमधील एका स्टार्टअपने आपले टेम्पलेट भाजपने वेबसाईटसाठी चोरल्याचा आरोप केला आहे. टेम्पलेटसाठी श्रेय दिले नाही, किमान आभार तरी मानावे अशी अपेक्षा या स्टार्टअपने व्यक्त केली आहे.

हॅक झालेली भाजपची वेबसाईट शुक्रवारी पूर्ववत झाली आहे. नवे टेम्पलेट भाजपच्या आयटी सेलने वापरल्याचा आरोप आंध्रप्रदेशमधील वे थ्री लेआऊट्स (W3layouts) या कंपनीने म्हटले आहे.

काय आहे नेमका आरोप-

ही रचना वापरण्यासाठी मोफत आहे. मात्र, त्या टेम्पलेटमागे एक लिंक आहे. या पेजच्या शेवटी ही लिंक दिसते, असे वे थ्री लेआऊट कंपनीने ब्लॉग पोस्टमध्ये म्हटले आहे. भाजप आयटी सेल आमचे टेम्पलेट वापरत असल्याने सुरुवातीला आम्ही आनंदी आणि उत्साही होतो. मात्र, त्यांनी कोणतेही पैसे न देता त्याची लिंक काढून टाकली. तसेच त्याचे श्रेयही वेबसाईटवर दाखविले नाही, असा आरोप कंपनीने केला आहे.

टेम्पलेट वापरत असल्याचे कोडिंगने समजू शकते - कंपनीचा दावा

आपल्या आयटी टीमला टेम्पलेटच्या अटी वाचण्याविषयी सांगा. तसेच तुमच्या आयटी टीमचा ई-मेल द्या, त्यांच्याशी बोलू, असेही कंपनीने म्हटले आहे. या आशयाचे ट्विट भाजपच्या ट्विरला संलग्न केल्यानंतर टेम्पलेटच्या बॅक लिंक काढून टाकण्यात आल्याचा कंपनीने दावा केला. आमचे टेम्पलेट वापरत असल्याचे कोडिंगने समजू शकते, असे कंपनीने स्पष्ट केले. हॅक झाल्याने भाजपची वेबसाईट ५ मार्चपासून 'मेटेन्स मोड'वर होती. तसे भाजपने ट्विटरवर पोस्टही केले होते.



ABOUT THE AUTHOR

...view details