मुंबई - नाविन्यपूर्ण ट्विट करत चर्चेत राहणारे महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचे चेअरमन आनंद महिंद्रा पदावरून पायउतार होणार आहेत. ही माहिती कंपनीने मुंबई शेअर बाजारासह निफ्टीला दिली आहे.
आनंद महिंद्रा हे १ एप्रिल २०२० पासून चेअरमन पद सोडणार आहेत. या निर्णयाला कंपनीच्या प्रशासनाने आणि नामांकन आणि वेतन समितीने (जीएनआरसी) मंजुरी दिली आहे. मात्र, या निर्णयाला कंपनीच्या शेअरधारकांची मंजुरी घ्यावी लागणार आहे.