महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

आयसीसी विश्वचषकासाठी भारताच्या नव्हे 'या' देशाच्या संघाला अमूल देणार मुख्य प्रायोजकत्व

अमूल तिसऱ्यांदा विश्वचषक स्पर्धेत क्रिकेट संघाला प्रायोजकत्व देत आहे. अमूलचा लोगो अफगाणिस्तानच्या क्रिकेटपटूंच्या जर्सीवर दिसणार आहे.

अमूलचे अफगाणिस्तान क्रिकेटला प्रायोजकत्व

By

Published : May 7, 2019, 7:05 PM IST

नवी दिल्ली -दूध उत्पादनातील अग्रेसर असलेली अमूल ही अफगाणिस्तान क्रिकेट संघाला मुख्य प्रायोजकत्व देणार आहे. हे प्रायोजकत्व आयसीसीच्या विश्वचषक स्पर्धेसाठी देण्यात येणार असल्याचे अमूलचे व्यवस्थापकीय संचालक आर.एस. सोधी यांनी सांगितले.

अफगाणिस्तानचा क्रिकेट संघ हा वेगाने सुधारणारा संघ आहे. त्यामुळे विश्वचषक स्पर्धेत अफगाणिस्तान क्रिकेट संघ हा बलाढ्य स्पर्धक होईल, असा विश्वास वाटत असल्याचे सोधी यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

अमूल तिसऱ्यांदा विश्वचषक स्पर्धेत क्रिकेट संघाला प्रायोजकत्व देत आहे. अमूलचा लोगो अफगाणिस्तानच्या क्रिकेटपटूंच्या जर्सीवर दिसणार आहे. तसेच प्रशिक्षणासाठी वापरल्या जाणाऱ्या किटवरही दिसणार आहे. अफगाणिस्तान क्रिकेटसाठी हा महत्त्वाचा क्षण असल्याची प्रतिक्रिया अफगाण क्रिकेट मंडळाचे मुख्य कार्यकारी अध्यक्ष असादुल्लाह खान यांनी दिली आहे. अमूलने प्रायोजकत्व दिल्याबद्दल त्यांनी आनंदही व्यक्त केला.

गुजरात कोऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशन (जीसीएमएमएफ) हे अमूल या ब्रँडच्या नावाने दूध व दूग्धजन्य पदार्थांची विक्री देशात करते. तर शेजारील देशात सुमारे २०० कोटींच्या उत्पादनांची दरवर्षी निर्यात करते.

ABOUT THE AUTHOR

...view details