महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

फ्युचर ग्रुप-रिलायन्स रिटेल सौद्यावर अॅमेझॉनचा आक्षेप; सेबीला लिहिले पत्र - फ्युचर ग्रुप न्यूज

सिंगापूरच्या लवादाने रिलायन्स रिटेल आणि फ्युचर ग्रुपमधील सौद्याला अंतरिम स्थगिती दिली आहे. त्यामुळे भारतीय नियामक संस्थांनाही लवादाच्या निकालाचा विचार करावा लागणार असल्याचे सूत्राने सांगितले.

संग्रहित
संग्रहित

By

Published : Oct 30, 2020, 1:15 PM IST

नवी दिल्ली - फ्युचअर ग्रुप आणि रिलायन्स रिटेलमधील सौद्याबाबत कार्यवाही करावी, अशी ई-कॉमर्स अ‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌ॅमेझॉनने सेबीला विनंती केली आहे. सिंगापूरच्या लवादाने २४ हजार ७१३ कोटींच्या सौद्याला दिलेल्या स्थगितीवर विचार करावा, असे अॅमेझॉनने सेबीला लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.

सिंगापूरच्या लवादाने रिलायन्स रिटेल आणि फ्युचर ग्रुपमधील सौद्याला अंतरिम स्थगिती दिली आहे. या निकालाची प्रत अ‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌ॅमेझॉनने सेबीसह मुंबई शेअर बाजार आणि निफ्टीलाही पाठविली आहे.

किशोरी बियानी यांच्या मालकीचा फ्युचर ग्रुप आणि रिलायन्समधील सौद्याच्या मंजुरीसाठी सेबीसह भारतीय स्पर्धात्मक आयोगाची परवानगी लागणार आहे.त्यामुळे भारतीय नियामक संस्थांनाही लवादाच्या निकालाचा विचार करावा लागणार असल्याचे सूत्राने सांगितले.

हा आहे अ‌ॅ‌‌‌‌मेझॉनचा आक्षेप-

अ‌ॅ‌‌‌‌मेझॉनने फ्युचर ग्रुपची कंपनी फ्युचर कुपनमध्ये ४९ टक्के हिस्सा घेतला होता. त्यानुसार फ्युचर रिटेलचा हिस्सा घेताना ३ ते १० वर्षांपर्यंत अ‌ॅ‌‌‌‌मेझॉनला प्राधान्य मिळावे, अशी करारात अट होती. फ्युचर कुपनचा फ्युचर रिटेलमध्ये ७.३ टक्के हिस्सा आहे. मात्र, फ्युचर ग्रुपने करार करत रिटेलचा घाऊक, किरकोळ व लॉजिस्टिक्सचा व्यवसाय रिलायन्सला दिला आहे.

रिलायन्स रिटेलमध्ये जागतिक कंपन्यांकडून गुंतवणूक

अद्याप, रिलायन्स आणि फ्युचर ग्रुपच्या व्यवहाराला भारतीय नियामक संस्थेकडून परवानगी मिळालेली नाही. रिलायन्स फ्युचर ग्रुप विकत घेतल्यानंतर जागतिक कंपन्यांनी रिलायन्स रिटेलमध्ये गुंतवणूक करण्यास सुरुवात केली आहे. रिलायन्स रिटेलमध्ये सिल्वर लेक, केकेआर, जनरल अटलांटिक, मुबादला, जीआयसी, टीपीजी आणि एडीआयए कंपन्यांनी ३७ हजार ७०० कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details