बंगळुरू- भारतीय स्पर्धा आयोगाने (सीसीआय) ई-कॉमर्स कंपनी अॅमेझॉनच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. या चौकशीविरोधात सीसीआयने कर्नाटक उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
सीसीआयने १३ जानेवारी, २०२० ला अॅमेझॉनच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. उचित स्पर्धेसाठी नियमन करणाऱ्या सीसीआयने आदेश दिल्याने कंपनीच्या प्रतिमेचे नुकसान झाल्याचे अॅमेझॉनने म्हटले आहे.
हेही वाचा-ओला लंडनमध्ये लाँच; २५ हजारांहून अधिक वाहन चालकांची नोंदणी
अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टवर काही विक्रेत्यांसह काही स्मार्टफोनच्या कंपन्यांना मोठ्या प्रमाणात विक्रीत सवलती देण्यात येत असल्याचा आरोप आहे. तसेच ई-कॉमर्स कंपनीकडून अनुचित व्यापारासह नियमांचा भंग होत असल्याच्या आरोपबाबत सीसीआय चौकशी करणार आहे. या चौकशीला अंतरिम स्थगिती द्यावी, अशी अॅमेझॉनने याचिकेत विनंती केली आहे. दरम्यान, हे प्रकरण न्यायालयात असल्याने प्रतिक्रिया देण्यास अॅमेझॉनने नकार दिला आहे.
हेही वाचा-गतवर्षीच्या तुलनेत कारच्या विक्रीत जानेवारीत ८ टक्के घसरण