नवी दिल्ली- अॅमेझॉनने प्राईम नाऊ हे डिलिव्हरी अॅप बंद करणार असल्याचे जाहीर केले आहे. या अॅपमधून ग्राहकाला दोन तासात डिलिव्हरी देण्याची सेवा मिळत होती. अॅमेझॉनने ही सेवा अॅमेझॉनच्या मुख्य अॅपसह वेबसाईटवर देण्यात येणार असल्याचे म्हटले आहे.
भारत, जपान आणि सिंगापूर हे अॅमेझॉन प्राईमवरून अॅमेझॉन आणि वेबसाईटकडे वळाले आहेत. त्यामुळे प्राईम नाऊ हे अॅप निवृत्त होत आहे. अमेरिकेत दोन तासांत डिलिव्हरी देण्याची सेवा ही अॅमेझॉन फ्रेश आणि व्होल फूड्स मार्केटधून २०१९ मध्ये देण्यात आली होती.
हेही वाचा-स्पूटनिक लशीचे ऑगस्टमध्ये भारतात सुरू होणार उत्पादन
शॉपिंग, ट्रॅकिंग ऑर्डर्ससाठी मिळणार नवे अॅप
सध्या कंपनीने ग्राहकांना शॉपिंगचा अनुभव देण्याकरिता स्थानिक स्टोअर्स आणि तृतीय पक्ष भागीदारांकडे वळाल्याचे अॅमेझॉन ग्रोसरची उपाध्यक्ष स्टेफनी लँड्री यांनी सांगितले. प्राईम नाऊ हे २०१४ मध्ये ऑन डिमांड शॉपिंग आणि डिलिव्हरी सेवेसाठी २०१४ मध्ये लाँच करण्यात आले होते. आता, शॉपिंग, ट्रॅकिंग ऑर्डर्स आणि कॉन्ट्रॅक्टिंग ग्राहक सेवेसाठी नवे अॅप उपलब्ध होणार आहे.
हेही वाचा-आरबीआय केंद्र सरकारला देणार १ लाख कोटी रुपये, जाणून घ्या सविस्तर
प्राईम नाऊ बंद, पण जगभरात मिळणार सेवा
प्राईम नाऊमधून वेगवान डिलिव्हरीचा पर्याय असलेले गिफ्ट, टॉयज, दैनंदिन जीवनावश्यक वस्तू आदी वस्तू हे अॅमेझॉनमध्ये उपलब्ध होणार असल्याचेही ही लँड्री यांनी सांगितले. ग्राहकांनी दोन तासांत डिलिव्हरी मिळू शकत असल्याचेने अॅमेझॉन प्राईम नाऊ अॅपला खूप चांगला प्रतिसाद दिला. त्यामुळे नैसर्गिकपणे ही सेवा जगभरात देण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत.
दरम्यान, अमेरिकेतील ग्राहक हे अलेक्सा शॉपिंगमधील वस्तू हे अॅमेझॉन फ्रेश किंवा व्होल फूड्स मार्केट शॉपिंग कार्टमध्ये जोडू शकणार आहेत.