महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

'या' कंपनीची कर्मचाऱ्यांना भन्नाट ऑफर, नोकरी सोडून व्यवसाय केल्यास देणार ७ लाख रुपये - अॅमेझॉन

ई-कॉमर्स कंपनीने  एका दिवसात ग्राहकांना ऑर्डर केलेल्या वस्तू घरपोहोच देणारी प्राईम डिलिव्हिरी योजना नुकताच जाहीर केली आहे.  त्यासाठी अॅमेझॉन ही ग्राहकांना घरपोहोच वस्तू पोहोचविण्याची सेवा स्वतंत्रपणे सुरू करण्याचा प्रयत्न करत आहे.

अॅमेझॉन

By

Published : May 14, 2019, 7:19 PM IST

सॅन फ्रान्सिस्को -बहुराष्ट्रीय कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना कोट्य़वधी रुपयांचे पॅकेज दिल्याचे तुम्ही ऐकले असेल. मात्र अॅमेझॉन कंपनीने कर्मचाऱ्यांना नोकरी सोडून स्वंतत्र व्यवसाय करण्यासाठी खास ऑफर दिली आहे. नोकरी सोडून माल घरपोहोच करणारे स्टार्टअप सुरू करण्यासाठी अॅमेझॉन कर्मचाऱ्यांना १० हजार डॉलरपर्यंत (सुमारे ७ लाख रुपये) आर्थिक मदत करणार आहे. सोबतच नोकरी सोडताना तीन महिन्यांची पगारही अॅमेझॉन कर्मचाऱ्यांना देणार आहे.


अॅमेझॉनने जून २०१८ मध्ये कर्मचाऱ्यांना स्टार्टअप सुरू करण्यासाठी प्रोत्साहन देण्याचे जाहीर केले. अॅमेझॉन ब्रँड असलेल्या व्हॅनमधून ग्राहकांपर्यंत घरपोहोच माल पुरण्यासाठी स्वतंत्र व्यवसाय सुरू करण्यासाठी कंपनीने कर्मचाऱ्यांकडून अर्ज मागविले. या आकर्षक ऑफरमध्ये हजारो कर्मचाऱ्यांनी स्वारस्य दाखविले. मात्र त्यासाठी भांडवल नसल्याने हा व्यवसाय परवडू शकत नसल्याचे बहुतांश कर्मचाऱ्यांनी म्हटले आहे. ही माहिती अॅमेझॉनचे वरिष्ठ उपाध्यक्ष डेव्ह क्लार्क यांनी अमेरिकेच्या माध्यमांना दिली.


एका दिवसात ग्राहकांना मिळणार घरपोहोच वस्तू-
ई-कॉमर्स कंपनीने एका दिवसात ग्राहकांना ऑर्डर केलेल्या वस्तू घरपोहोच देणारी प्राईम डिलिव्हिरी योजना नुकताच जाहीर केली आहे. त्यासाठी अॅमेझॉन ही ग्राहकांना घरपोहोच वस्तू पोहोचविण्याची सेवा स्वतंत्रपणे सुरू करण्याचा प्रयत्न करत आहे. यापूर्वी अॅमेझॉनच्या वस्तू ग्राहकांपर्यंत घरपोहोचण्यासाठी दोन दिवस लागत होते. सध्या अॅमेझॉन ग्राहकापर्यंत वस्तू पोहोचविण्यासाठी फेडएक्स (एफइडीएक्स) व पोस्टाच्या सेवेची मदत घेत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details