नवी दिल्ली- सणासुदीत विक्री करून प्रचंड नफा मिळविणाऱ्या अॅमेझॉनने भारतीय कर्मचाऱ्यांना ६,३०० रुपयापर्यंत विशेष बोनस देण्याचे जाहीर केले आहे. अशाच प्रकारचा बोनस अॅमेझॉनने इतर देशातील कर्मचाऱ्यांना दिला आहे. कंपनीला मोठा आर्थिक नफा मिळाल्याचा दावा केला जात आहे.
अॅमेझॉन कंपनीने जागतिक पातळीवर 'मेक अमेझॉन पे'ही मोहीम सुरू केली आहे. अशातच कंपनीने कर्मचाऱ्यांकरता विशेष बोनस जाहीर केला आहे. अॅमेझॉनचे वरिष्ठ उपाध्यक्ष (जागतिक संचलन) डेव क्लार्क यांनी भारतीय कर्मचाऱ्यांना बोनस देण्यात येणार असल्याचे ब्लॉगपोस्टमध्ये म्हटले आहे. जे कर्मचारी ऑक्टोबर १६ ते १३ नोव्हेंबरमध्ये रुजू झाले त्यांना ६,३०० रुपये बोनस जाहीर केला आहे. तर अर्धवेळ काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ३,१५० रुपये बोनस जाहीर केला आहे.
हेही वाचा-ई-कॉमर्स कंपन्यांना 'सुगीचे दिवस'; ऑनलाईन विक्रीत गतवर्षीच्या तुलनेत ५५ टक्क्यांची वाढ
डेव क्लार्क यांनी पोस्टमध्ये म्हटले, की समाजाची सेवा करताना मोठे योगदान देणाऱ्या आमच्या टीमचा खूप आभारी आहे. आम्ही भारतामधील सणांमधून नुकतेच बाहेर पडलो आहे. विशेष बोनस देऊन त्यांची दखल घेण्याची आमची इच्छा आहे. आघाडीवर काम करणाऱ्या जगभरातील कर्मचाऱ्यांना ५०० दशलक्ष डॉलरहून बोनस दिला जात असल्याचेही त्यांनी म्हटले.