मुंबई - अॅमेझॉन ही ऑनलाईन कंपनी महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात विस्तार करत आहे. अॅमेझॉनने भिंवडीमध्ये नवे फुलफिलमेंट सेंटर सुरू केले आहे.
भिंवडीमधील अॅमेझॉनचे केंद्र हे १.५ दशलक्ष क्युबिक फूट जागेत आहे. या केंद्रामुळे जवळील राज्यात तसेच महाराष्ट्रात ग्राहकांपर्यंत वेगाने उत्पादने पोहोचविणे शक्य होणार आहे. महाराष्ट्रातील हे १४ वे केंद्र असणार आहे. तर राज्यामध्ये अॅमेझॉनची ६ दशलक्ष क्युबिक फूट क्षमता झाल्याचे अॅमेझॉनने म्हटले आहे.