महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

ग्राहकांना अॅमेझॉनवरून करता येणार विमान सेवेचे बुकिंग - अॅमेझॉन पे

विमान सेवा बुकिंग करण्याची सुविधा ही अॅमेझॉन पे पेज, अॅमेझॉन मोबाईल अॅप व कंपनीच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे.

अॅमेझॉन

By

Published : May 19, 2019, 12:38 PM IST

बंगळुरू - देशात जर तुम्हाला विमान प्रवास करायचे असेल, त्यासाठी अॅमेझॉनवरुनही बुकिंग करता येणार आहे. अॅमेझॉनने पैसे पाठविणे, बिल भरणे आणि मोबाईल रिचार्ज याबरोबर विमान प्रवासाच्या बुकिंगची सेवा दिली आहे. याबाबतची घोषणा कंपनीने शनिवारी केली.


अॅमेझॉनने क्लिअरट्रीप या ऑनलाईन ट्रॅव्हल कंपनीबरोबर भागीदारी केली आहे. यातून प्रवाशांना उत्कृष्ट अनुभव येईल, असे अॅमेझॉन पेचे संचालक शरिक प्लास्टिकवाला यांनी सांगितले. ही सेवा देताना आम्हाला आंनद होत असल्याचे प्लास्टिकवाला यांनी म्हटले.


ग्राहकांनी तिकिट रद्द केले तर कोणतेही त्यांच्यावर अतिरिक्त शुल्क लावण्यात येणार नाही. त्यांना केवळ विमान कंपनीकडून लावण्यात येणारा दंड भरावा लागणार असल्याचे अॅमेझॉनने म्हटले आहे. विमान सेवा बुकिंग करण्याची सुविधा ही अॅमेझॉन पे पेज, अॅमेझॉन मोबाईल अॅप व कंपनीच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details