नवी दिल्ली- अॅमेझॉनने डिजीटल देयक अॅपमध्ये आणखी २२५ कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. ही माहिती कंपनीने शेअर बाजाराला दिली आहे.
अॅमेझॉन पेमध्ये आणखी गुंतवणूक केल्याने अॅमेझॉनला फोनपे, गुगल पे आणि पेटीएमशी अधिक आक्रमकपणे स्पर्धा करणे शक्य होणार आहे. अॅमेझॉन पेमध्ये अॅमेझॉन कंपनीने गतवर्षी ऑक्टोबरमध्ये ७०० कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. तर जानेवारीमध्ये १,३५५ कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. अॅमेझॉनकडून भारताममध्ये मार्केटप्लेस, घाऊक विक्री आणि देयक व्यवहार यामध्ये सातत्याने गुंतवणूक करण्यात येत आहे. त्यामधून देशातील बाजारपेठेत स्थान अधिक भक्कम करण्याचा अॅमेझॉनचा प्रयत्न आहे.