बंगळुरू - अॅमेझॉन इंडियाने स्मार्टफोन आणि अॅक्सेसरीज सवलतीच्या दरात देणारी 'फॅब फोन्स फेस्ट' ची नवी श्रेणी आज जाहीर केली. ही सवलत योजना १९ डिसेंबरपासून २३ डिसेंबरपर्यंत सुरू राहणार आहे.
ग्राहकांना फॅब फोन्स फेस्टमधून सवलतीच्या दरात सॅमसंग, वनप्लस, अॅपल, व्हिवो, ओप्पो, हुवाई आणि होनरचे स्मार्टफोन खरेदी करता येणार आहेत. या कंपन्यांच्या अॅक्सेसरीजही ग्राहकांना सवलतीच्या दरात खरेदी करता येणार आहेत. ग्राहकांना विनाव्याज ईएमआयवरही स्मार्टफोन खरेदी करता येणार आहेत. तसेच जुना मोबाईल देवूनही नवा मोबाईलही खरेदी करण्याचा ग्राहकांना पर्याय देण्यात आलेला आहे.