महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

अॅमेझॉन भारताला देणार १० हजार ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर्स - Pune Platform for COVID 19 Response

देशात तातडीने ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर्स आणि बीपॅप मशिन्स उपलब्ध करून देण्यासाठी कंपनी केंद्र सरकारबरोबर काम करत असल्याचे अॅमेझॉनने म्हटले आहे. आम्ही देशाबरोबर आहोत. देशात ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर्स आणण्यासाठी आमचे जागतिक लॉजिस्टिक्स नेटवर्क्स सुसज्ज ठेवल्याचे कंपनीने म्हटले आहे.

Amazon
अॅमेझॉन

By

Published : Apr 26, 2021, 3:14 PM IST

नवी दिल्ली -कोरोनाबाधितांचे आणि त्यांच्या मृत्युचे प्रमाण वाढताना कॉर्पोरेट कंपन्या मदतीसाठी पुढे येत आहेत. अॅमेझॉनने रुग्णालयांना 10 हजार ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर्स आणि बीपॅप मशिन देण्याचे जाहीर केले आहे. या मशिन विविध शहरांमधील रुग्णालय आणि सरकारी संस्थांमध्ये वापरण्यात येणार आहेत.

अॅमेझॉनने जाहीर केलेल्या मदतीप्रमाणे काही मशिन्स मुंबईमध्ये रविवारी दाखल झाल्या आहेत. बहुतांश सर्व मशिन्स 30 एप्रिलपर्यंत दिल्या जाणार आहेत. कोरोनाच्या काळात अॅमेझॉनने एसीटी ग्रँट्स, टेमासेक फाउंडेशन, पुणे प्लॅटफॉर्म फॉर कोरोना रिस्पॉन्स (पीपीसीआर) आणि इतर भागीदारांच्या मदतीने सिंगापूरहून 8 हजार ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर्स आणि 500 बीपॅप मशिन्स तातडीने आणल्या आहेत.

हेही वाचा-केंद्राकडून कोरोना लशीसह ऑक्सिजन उपकरणांवरील आयात शुल्क माफ

देशात तातडीने ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर्स आणि बीपॅप मशिन्स उपलब्ध करून देण्यासाठी कंपनी केंद्र सरकारबरोबर काम करत असल्याचे अॅमेझॉनने म्हटले आहे. आम्ही देशाबरोबर आहोत. देशात ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर्स आणण्यासाठी आमचे जागतिक लॉजिस्टिक्स नेटवर्क्स सुसज्ज ठेवलेले आहे. देशामध्ये हवाईमार्गाने आणण्यात येणाऱ्या वैद्यकीय उपकरणांचा खर्च कंपनी करणार असल्याचे अॅमेझॉन इंडियाचे ग्लोबल एसव्हीपी अमित अग्रवाल यांनी सांगितले.

हेही वाचा-प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना : मेपासून दोन महिने गरिबांना 5 किलो धान्याचे वाटप

देशांतर्गत वाहतुकीचा खर्चही अॅमेझॉन करणार
पीपीसीआर, एसीटी ग्रँटस अशा एनजीओ विदेशातून ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर्स आणि बीपॅप मशिन्स एअर इंडिया आणि आंतरराष्ट्रीय कॅरियर्स करण्यात येणार आहेत. त्यांचाही खर्च अॅमेझॉन कंपनी करणार आहे. देशातील ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर्स आणि इतर वैद्यकीय उपकरणांची विमानतळापासून रुग्णालय आणि संस्थापर्यंतच्या वाहतुकीचा खर्चही अॅमेझॉन कंपनी करणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details