वॉशिंग्टन- अॅमेझॉन भारताध्ये खूप चांगला व्यवसाय करत असल्याचे सांगून कपंनीचे संस्थापक, सीईओ जेफ बेझोस यांनी समाधान व्यक्त केले. भारतामधील नियमनाच्या धोरणात स्थिरता राहिल, अशी आशा व्यक्त केली.
जेफ बेझोस यांना डिजिटायझेशनच्या भारतीय धोरणाबद्दल प्रश्न माध्यमांनी विचारला. यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, भारतात अॅमेझॉनचा खूप चांगला व्यवसाय होत आहे. भारतामध्ये अॅमझॉनचा वेगाने व्यवसाय वाढत आहे. अॅमेझॉनचे भारतीय प्रमुख अमित अग्रवाल यांच्यासोबत २० वर्षे काम केले आहे. ते असामान्य नेतृत्व असल्याचे कौतुकही जेफ यांनी केले.