नवी दिल्ली - गतवर्षी जगात सर्वाधिक वेतनांसह भत्ते हे भारतीय वंशांच्या सुंदर पिचाई यांना मिळाले आहे. ही रक्कम ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल. अमेरिकेची तंत्रज्ञान कंपनी अल्फाबेटचे सीईओ असलेल्या पिचाई यांना गेल्यावर्षी २८.१ कोटी डॉलर म्हणजे सुमारे २.१४४.५३ कोटी रुपयांचे वेतन आणि भत्ते मिळाले आहेत.
सुंदर पिचाई यांना मिळणाऱ्या पॅकेजमध्ये अधिकांश शेअरचा हिस्सा आहे. पिचाई यांना २०१९ मध्ये ६.५ लाख डॉलरचे वेतन म्हणजे ५ कोटी रुपये मिळाले होते. अल्फाबेटचे संस्थापक लॅरी पेज आणि सर्गी ब्रिन यांनी राजीनामे दिल्यानंतर कंपनीची सीईओ म्हणून पिचाई यांची नियुक्ती केली आहे. पिचाई यांच्यावर गुगलच्या सीईओपदाचीही जबादारी आहे.