नवी दिल्ली -एअरटेल कंपनीने दुसऱ्या नेटवर्कवरील कॉलिंगसाठी शुल्क लागू केले होते. हे शुल्क रद्द करून पुन्हा आउटगोईंग मोफत केले आहे.
एअरटेलने ३ डिसेंबरला रिचार्जचे नवे प्लॅन जाहीर केले होते. त्यामध्ये २८ दिवसांची मुदत असलेल्या रिचार्जवर दुसऱ्या नेटवर्कवर १ हजार मिनिटेच मोफत बोलता येणार होते. याशिवाय इतर रिचार्ज प्लॅनवरही आउटगोईंगची मर्यादा घालून दिलेली होती. ही मर्यादा संपल्यानंतर प्रति मिनिटाला ६ पैसे आकारण्यात येत होते. कंपनीने रिचार्ज दरात ५० टक्के वाढ लागू केली आहे. दुसऱ्या नेटवर्कवर अमर्यादित प्लॅनवरून अर्मयादित बोलता येणार आहे. त्यासाठी कोणतीही अट नसल्याचे भारती एअरटेलने शुक्रवारी ट्विट केले.