नवी दिल्ली - मोबाईलच्या वापरकर्त्यांसह दूरसंचार कंपन्यांना ५ जी तंत्रज्ञानाचे वेध लागले आहे. भविष्यातील तंत्रज्ञान असलेल्या ५ जी साठी दूरसंचार कंपनी भारती एअरटेल आणि क्वालकोम्न टेक्नॉलॉजीस या कंपन्यांनी संयुक्त भागीदारी केली आहे.
देशात ५ जी तंत्रज्ञान सुरू करण्यासाठी दूरसंचार कंपन्यांमध्ये तगडी स्पर्धा सुरू आहे. एअरटेलने ५ जी तंत्रज्ञानानाची कमर्शियल नेटवर्कवर हैदराबादमध्ये चाचणी घेऊन बाजी मारली आहे. त्याच्या पुढे जाऊन कंपनीने क्वालकोम्न टेक्नॉलॉजीसबरोबर संयुक्त भागीदारीचा करार केला आहे. त्याबाबत माहिती देताना एअरटेलने म्हटले की, नेटवर्क व्हेंडर्स आणि डिव्हाईस पार्टनर्स, दूरसंचार कंपन्यांकडून क्वालकोम्न ५ जी रॅन प्लॅटफॉर्म वापरणार आहेत. त्याचा वापर व्हर्च्युल आणि ओपन रॅन असलेल्या ५ नेटवर्कसाठी करता येणार आहे.
हेही वाचा-पाच सत्रात शेअर बाजार निर्देशांकात २,४१० अंशांची घसरण; ही आहेत चार कारणे