सिंगापूर- टाळेबंदीमुळे देशातील विमान कंपन्यांचे चालू वर्षात ८५ हजार १२० कोटींचे नुकसान होणार आहे. प्रवासी तिकिटांची मागणी ४७ टक्के कमी झाल्याने २९ लाख जणांच्या नोकऱ्या धोक्यात आहेत. याबाबतची माहिती आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक संघटनेने (आयएटीए) जाहीर केली आहे.
आशिया पॅसिफिकमध्ये विमान कंपन्यांचा ८ लाख ५८ हजार ८०० कोटी रुपयांचा महसूल बुडणार असल्याचे आयएटीएचे प्रादेशिक उपाध्यक्ष कोनराड क्लिफ्फोर्ड यांनी म्हटले आहे. जर सरकारने वेळीच हस्तक्षेप केला नाही तर विमान कंपन्यांचे मोठे नुकसान होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
हेही वाचा-...म्हणून केंद्र सरकारने दुसरे पॅकेज केले नाही जाहीर - सुभाष चंद्र गर्गांचा दावा