मुंबई- टाळेबंदीदरम्यान देश व विदेशातील उड्डाणे स्थगित असल्याने विमान कंपन्यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्या पार्श्वभूमीवर एअर आशिया इंडिया कंपनीने कर्मचाऱ्यांच्या वेतनात २० टक्के कपात केली आहे.
ज्या कर्मचाऱ्यांचे मासिक वेतन ५० हजार रुपये व त्याहून कमी आहे, अशा कर्मचाऱ्यांना वेतन कपातीमधून एअर आशियाने दिलासा दिला आहे. वरिष्ठ व्यवस्थापनामधील अधिकाऱ्यांच्या वेतनात २० टक्के वेतन कपात होणार आहे. तर विविध श्रेणीमध्ये १७ टक्के, १३ टक्के आणि ७ टक्के अशी वेतन कपात होणार असल्याचे सूत्राने सांगितले.