महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

कोरोनाने मृत्यू झाल्यास एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांना 10 लाखापर्यंत मदत - Air India to pay compensation if employees die due to covid

महामारीच्या काळात अनेक कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. तर काही जणांचा कोरोनाने मृत्यू झाल्याचे एअर इंडियाने विभागीय संचालकांना पाठविलल्या पत्रात म्हटले आहे.

एअर इंडिया
एअर इंडिया

By

Published : Jul 21, 2020, 6:29 PM IST

नवी दिल्ली- एअर इंडियाच्या सुमारे दोनशे कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. अशा स्थितीत एअर इंडियाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांना 90 हजार ते दहा लाखापर्यंतची मदत एअर इंडिया करणार आहे.

एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबीयांना देण्यात येणाऱ्या मदतीचे पत्र ईटीव्ही भारतला मिळाले आहे.

  • कंपनीत कायमस्वरूपी नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या कुटुंबीयांना एअर इंडियाकडून दहा लाख रुपये देण्यात येणार आहेत.
  • कंत्राटी पद्धतीने ठराविक मुदतीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या कुटुंबीयांना एअर इंडिया पाच लाख रुपये देणार आहे.
  • वर्षभरासाठी काम करणार्‍या कर्मचार्‍याचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या कुटुंबीयांना 90 हजार रुपये कंपनी देणार आहे.
  • कंत्राटदाराकडून अथवा पुरवठादारांकडून काम करणाऱ्या कर्मचार्‍याचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या कुटुंबीयांना इंडियाकडून एकूण दोन महिन्यांचे वेतन देण्यात येणार आहे.

महामारीच्या काळात अनेक कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. तर काही जणांचा कोरोनाने मृत्यू झाल्याचे एअर इंडियाने विभागीय संचालकांना पाठविलल्या पत्रात म्हटले आहे.

सूत्राच्या माहितीनुसार 200 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. तर दहा जणांचा मृत्यू झाला आहे. यावर एअर इंडियाच्या प्रवक्त्याकडून अद्याप प्रतिक्रिया मिळाली नाही.

ABOUT THE AUTHOR

...view details