नवी दिल्ली - राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची २ ऑक्टोबरला १५० वी जयंती साजरी करण्यात येत आहे. राष्ट्रपित्याला मानवंदना करण्यासाठी एअर इंडिया पाच विमानांवर महात्मा गांधींचे चित्र लावणार आहे.
राष्ट्रपित्याची १५० जयंती; एअर इंडिया 'असे' करणार अभिवादन - राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती
दिल्ली-मुंबई या विमान मार्गावर असलेल्या एअरबस ए ३२० वर महात्मा गांधींचे ११ x ४.९ फुटांचे चित्र रंगविण्यात आले आहे.
महात्मगा गांधीजींचे चित्र असलेले विमान
येत्या १५ दिवसात एअर इंडियाच्या विमानावर महात्मा गांधीजींचे चित्र लावण्यात येणार आहे. एअर इंडियाचे चेअरमन तथा व्यवस्थापकीय संचालकांनी राष्ट्रपित्याचे चित्र बोईंग विमानावर लावण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे एअर इंडियाच्या प्रवक्त्याने सांगितले. यामध्ये ७४७, ७७७, ७८७, ३२० आणि एटीआर विमान असल्याचे प्रवकत्याने माहिती दिली.
दिल्ली-मुंबई या विमान मार्गावर असलेल्या एअरबस ए ३२० वर महात्मा गांधींचे ११ x ४.९ फुटांचे चित्र रंगविण्यात आले आहे.
Last Updated : Oct 3, 2019, 1:33 PM IST