नवी दिल्ली – एकदा दिलेले राजीनामे परत घेता येणार नाहीत, अशी माहिती आर्थिक संकटात सापडलेल्या एअर इंडियाने कर्मचाऱ्यांना दिली आहे. कर्मचाऱ्यांना वेतन देण्याची कंपनीची आर्थिक क्षमता नाही, असेही एअर इंडियाने म्हटले आहे.
एअर इंडियाच्या मनुष्यबळ विभागाने एका वैमानिकाला पात्र पाठवून भूमिका स्पष्ट केली आहे. वेतन मिळत नसल्याने या कर्मचाऱ्याने राजीनामा दिला होता. त्यानंतर राजीनामा परत घेण्यासाठी त्याने एअर इंडियाकडे अर्ज केला होता.
एअर इंडियाच्या मनुष्यबळ विभागाने वैमानिकाला पाठविलेल्या पत्रात म्हटले, की कंपनी कोणतेही राजीनामे परत मागे देणार नाही. यापूर्वीच कंपनीवर आर्थिक ताण आहे. कोरोनाची जागतिक महामारीचा असामान्य आणि अपवादात्मक परिणाम झाला आहे. अशा स्थितीतच कंपनीच्या व्यवसायावर परिणाम झाला आहे. कोरोना महामारीत कमी प्रमाणात कंपनीचे काम सुरू आहे. येत्या काळात परिस्थिती फारशी बदलणार नाही. कंपनीचा मोठा तोटा वाढल्याने पैसे देण्याची एअर इंडियाची आर्थिक क्षमता नाही, असे एअर इंडियाने कर्मचाऱ्याला पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.
दरम्यान, एअर इंडियाने केब्रिन क्रूच्या काही कर्मचाऱ्यांना गुरुवारी नोकरीतून कमी केले आहे.