महाराष्ट्र

maharashtra

भारतीय नागरिकांची गोपनीयता सुरक्षित राहण्याबाबत केंद्र सरकारशी सहमत - व्हॉट्सअॅप

By

Published : Nov 1, 2019, 7:52 PM IST

आम्ही सायबर हल्ले करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई केली आहे. व्हॉट्सअॅप ही कंपनी सर्व मेसेज वापरकर्त्यांची गोपनीयता सुरक्षित राहण्यासाठी बांधील असल्याचेही व्हॉट्सअॅपने म्हटले आहे.

संग्रहित - व्हॉट्सअॅप

नवी दिल्ली - इस्त्राईलच्या कंपनीने भारतामधील मानवी हक्क कार्यकर्ते आणि पत्रकारांच्या मोबाईलमध्ये मालवेअर सोडून हॅक करण्याचा प्रयत्न झाल्याचे समोर आले आहे. यावर व्हॉट्सअॅपने मोठी कारवाई केल्याचे म्हटले आहे. नागरिकांच्या गोपनीयतेचे हितसंरक्षण करण्याबाबत कंपनी ही सरकारशी सहमत असल्याचेही व्हॉट्सअॅपने म्हटले आहे.

फेसबुकच्या मालकी असलेल्या व्हॉट्सअॅपने भारतीय पत्रकार आणि मानवाधिकार कार्यकर्त्यांना लक्ष्य करण्यासाठी इस्राईलची कंपनी स्पायवेअर वापरत असल्याचे म्हटले आहे. या प्रकाराबाबत केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने फेसबुकला विचारणा करणारे पत्र लिहिले आहे. तसेच देशातील कोट्यवधी नागरिकांच्या गोपनीयतेचे संरक्षण करण्यासाठी काय पावले उचलली आहेत? याची माहितीही भारत सरकारने व्हॉट्सअॅपकडून मागविली आहे.

भारत सरकारने व्हॉट्सअॅपला ४ नोव्हेंबरपर्यंत उत्तर द्यायला सांगितले आहे. ग्राहकांच्या गोपनीयतेचे हितसंरक्षण करण्याबाबत भारत सरकारने केलेल्या विधानाबाबत आम्ही सहमत आहोत. त्यामुळेच आम्ही सायबर हल्ले करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई केली आहे. व्हॉट्सअॅप ही कंपनी सर्व वापरकर्त्यांचे मेसेजगोपनीयता सुरक्षित राहण्यासाठी बांधील असल्याचेही व्हॉट्सअॅप प्रवक्त्याने म्हटले आहे.

हेही वाचा-इस्राईलच्या कंपनीकडून पत्रकारांना लक्ष्य करण्याकरिता व्हॉट्सअॅपचा वापर, सरकारकडून फेसबुकला विचारणा

एनएसओ ग्रुपने जगभरातील १ हजार ४०० लोकांच्या स्मार्टफोनला केले लक्ष्य

इस्राईलमधील एनएसओ ग्रुपने तंत्रज्ञानाचा वापर करत जगभरातील १ हजार ४०० लोकांच्या स्मार्टफोनला लक्ष्य केल्याचे व्हॉट्सअॅपने म्हटले आहे. यामध्ये राजकीय विरोधक, पत्रकार आणि सरकारमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. मात्र, यामध्ये कोणत्या पत्रकार आणि कार्यकर्त्यांचा समावेश हे कंपनीने जाहीर केले नाही.

हेही वाचा-व्हॉट्सअॅप हेरगिरी प्रकरण : 'नागरिकांच्या स्वातंत्र्याचं रक्षण करण्यास सरकार कटीबद्ध'

मे दरम्यान संबंधित पत्रकारांच्या स्मार्टफोनला लक्ष्य करण्याचे इस्त्राईलच्या कंपनीने थांबविले आहे. या कंपनीकडून व्हिडिओ कॉलिंग सिस्टिममधून मालवेअर हा वापरकर्त्याच्या स्मार्टफोनमध्ये सोडण्यात येत होता. व्हॉट्सअॅपने या प्रकाराची जगातील १ हजार ४०० वापरकर्त्यांना माहिती दिली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details