महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

येस बँकेवरील आर्थिक संकटानंतर महाराष्ट्र सरकारने 'हा' घेतला मोठा निर्णय - Mumbai Mayor Kishori Pednekar

मुंबई महापालिका, काही नागरी संस्था व सरकारी विभागांची खाती खासगी बँकांमध्ये आहेत. मात्र, त्याचा पुनर्विचार करण्यात येणार असल्याची शक्यता आहे.

Yes Bank
येस बँक

By

Published : Mar 6, 2020, 3:18 PM IST

मुंबई - खासगी क्षेत्रातील येस बँक आर्थिक संकटात आहे. ही स्थिती लक्षात घेता महाराष्ट्र सरकारने सर्व खाती केवळ सरकारी बँकांमध्येच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

सर्व विभागांची खाती ही सरकारी बँकांमध्येच असावीत, असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काढले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सरकारची खाती ही खासगी बँकेत नसल्याचे सांगितले.

मुंबई महापालिका, काही नागरी संस्था व सरकारी विभागांची खाती खासगी बँकांमध्ये आहेत. मात्र, त्याचा पुनर्विचार करण्यात येणार असल्याची शक्यता आहे.

हेही वाचा-येस बँकेवरील संकटावर केंद्रीय अर्थमंत्र्यांनी 'ही' दिली प्रतिक्रिया

मुंबई महापालिकेच्या आयुक्त किशोरी पेडणेकर यांनी काही खाती खासगी बँकांमधून सरकारी बँकामध्ये वळती करणार असल्याचे म्हटले होते. सुरक्षिततेसाठी सरकारी बँकांकडे काही पूर्वसावधगिरीच्या उपाययोजना असतात. पोलीस विभागाची खाती ही अॅक्सिस बँकेमध्ये आहेत. याचाही सरकार पुनर्विचार करण्याची शक्यता आहे.

हेही वाचा-'आरबीआय'ने येस बँकेवर लादले निर्बंध, खात्यातून ५० हजारपर्यंतचीच रक्कम काढता येणार

दरम्यान, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दणका दिला आहे. पदाचा गैरवापर करून सरकारी कर्मचाऱ्यांचे खाते अ‌ॅक्सिस बँकेत वळविल्याप्रकरणी उच्च न्यायालयाने माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नोटीस बजावली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details