महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

पतमानांकन संस्थांची खालावली 'पत', केअर रेटिंग्जने व्यस्थापकीय संचालक मोकाशींना पाठविले सुट्टीवर - मराठी बिझनेस न्यूज

केअर रेटिंग्जच्या संचालक मंडळाच्या बैठकीत राजेश मोकाशी यांनी सुट्टीवर पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यांच्याबाबत करण्यात आलेली तक्रारीचे परीक्षण सध्या सेबीकडे प्रलंबित असल्याचे केअरने सेबीला दिलेल्या माहितीत  म्हटले आहे.

सौजन्य - केअर रेटिंग्ज वेबसाईट

By

Published : Jul 19, 2019, 1:54 PM IST

नवी दिल्ली - कंपन्यांच्या वित्तीय कामगिरी आणि जोखमीबाबत मानांकन करणाऱ्या पतमानांकन संस्थांचीच 'पत' खालावल्याचे चित्र निर्माण झाले आहे. इक्रा या पतमानांकन संस्थेनंतर केअर (सीएआरई) या पतमानांकन संस्थेनेही आपल्या मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश मोकाशी यांना सुट्टीवर पाठविले आहे. मोकाशी यांच्याबाबत सेबीकडे एक निनावी तक्रार करण्यात आली होती.

केअर संस्थेने कार्यकारी संचालक टी.एन. अरुण कुमार यांची अंतरिम मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. या निर्णयाची माहिती केअरने सेबीला दिली आहे. केअर रेटिंग्जच्या संचालक मंडळाच्या बैठकीत राजेश मोकाशी यांनी सुट्टीवर पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यांच्याबाबत करण्यात आलेली तक्रारीचे परीक्षण सध्या सेबीकडे प्रलंबित असल्याचे केअरने सेबीला दिलेल्या माहितीत म्हटले आहे.


इक्रा या पतमानांकन संस्थेने नुकतेच कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी नरेश टक्कर यांना सक्तीच्या सुट्टीवर पाठविले आहे. भांडवली बाजाराचे नियमन करणाऱ्या सेबीकडे टक्कर यांचीदेखील चौकशी प्रलंबित आहे.

आयएल अँड एफएसलने कर्ज थकविल्यामुळे पतमानांकन संस्था रडारवर-
आयएल अँड एफएसलला 'एएए' हे मानांकन देण्यासाठी नरेश टक्कर यांनी अप्रत्यक्ष प्रयत्न केल्याचे एका माध्यमाने वृत्त दिले होते. एएए हे विश्वासर्हतेचे मानांकन असतानाही आएएल अँड एफएस ही प्रचंड कर्जबाजारी असल्याचे उघडकीस आले. आएएल अँड एफएसने सुमारे ९० हजार कोटींहून अधिक कर्ज थकविले आहे. त्यामुळे बिगर बँकिंग वित्तीय क्षेत्राला अपुऱ्या कर्जपुरवठ्याची समस्या भेडसावत आहे.


विशेष म्हणजे नुकतेच आरबीआयने टक्कर यांची गृहवित्त विकास सुरक्षितता बाजार (डेव्हलपमेंट ऑफ हाउसिंग फायनान्स सिक्युरिटीसेशन मार्केट) समितीवर नियुक्ती केली होती.

ABOUT THE AUTHOR

...view details