नवी दिल्ली- कोव्हिशिल्डची लस घेऊन आंतरराष्ट्रीय प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. 16 युरोपियन देशांनी कोव्हिशिल्डची लस घेणाऱ्या प्रवाशांना परवानगी दिली आहे. सीरमचे सीईओ अदर पुनावाला यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.
कोव्हिशिल्डची लस घेणाऱ्यांना 16 युरोपियन देशांनी त्यांच्या देशात प्रवेशाची परवानगी देण्याचा निर्णय घेतला. मात्र, प्रत्येक देशाच्या मार्गदर्शक सूचना वेगळ्या असणार आहेत. ही प्रवास करणाऱ्यांसाठी खरोखर चांगली बातमी असल्याचे सीरमचे सीईओ अदर पुनावाला यांनी ट्विटमध्ये आहे.
हेही वाचा-संपूर्ण देशात लसीकरण होण्याकरिता दोन-तीन वर्षे लागणार-अदर पुनावाला
तोडगा निघेल, असे पुनावाला यांनी दिले होते आश्वासन-
कोव्हिशिल्डच्या उत्पादनासाठी पुण्यातील सीरम इन्स्टि्यूटने ऑक्सफोर्ड अॅस्ट्राझेनेकाकडून परवाना घेतला आहे. सीरम इन्स्टिट्यूटचे सीईओ अदर पुनावाला यांनी ट्विट केले होते. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले होते, की जे भारतीय युरोपियनमध्ये प्रवास करण्यात अडथळ्यांचा सामना करत आहेत, त्यांना आश्वस्त करू इच्छितो. हा प्रश्न उच्चस्तरीय पातळीवर नेण्यावर आहे. त्यावर लवकरच तोडगा निघेल, अशी आशा आहे. ही समस्या दोन्ही देशांमधील नियामक आणि राजनैतिक पातळीवर उपस्थित करण्यात येणार असल्याचे ट्विटमध्ये म्हटले होते.