नवी दिल्ली - ऑनलाईन मोहिम राबवून कंपनीविरोधात चुकीचा प्रोपॅगंडा राबविला जात असल्याचा आरोप अदानी ग्रुपने केले आहे. कंपनीच्या कामकाजाबाबत द्वेषयुक्त मोहिम राबविल्यास न्यायालयात खटला दाखल करण्याचा इशाराही कंपनीने दिला आहे.
अनाकलनीय अशा शक्तीकडून राबविण्यात येणाऱ्या द्वेषयुक्त मोहिमेचा अदानी ग्रुपवर परिणाम होत आहे. त्यावर कारवाई करण्यासाठी अदानी ग्रुपने ट्विटर खुले पत्र पोस्ट केले आहे. अचूकता, वस्तुनिष्ठता आणि निष्पक्षता हे संतुलित आणि योग्य पत्रकारिते मुलभूत तत्वे आहेत, असे पत्रात नमूद केले आहे.
पुढे पत्रात म्हटले की, अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली रणनीतीच्या हिताचे नुकसान होत आहे. तसेच आमच्यावर विश्वास ठेवणाऱ्या समभागधारकांवर परिणाम होत आहे. आमच्यापुढे हितसंरक्षण करण्याशिवाय कोणताही परिणाम नाही. त्यासाठी न्यायालयात दावे दाखल करणार असल्याचा इशारा अदानी ग्रुपने दिला आहे. माध्यमांचा खूप आदर आहे. त्यांच्या विरोधी मतांचाही स्वीकार केल्याचे अदानी ग्रुपने पत्रात म्हटले आहे. भारतीय न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. त्यांनी घेतलेल्या निर्णयाचा पूर्ण स्वीकार केला जाणार आहे.
हेही वाचा-हलवा समारंभ संपन्न ; पहिल्यांदाच अर्थसंकल्प छपाईसाठी होणार नाही रवाना