मुंबई- अमेरिकन तंत्रज्ञान कंपनी अॅसेंचरने देशातील तिसरे 'इनोव्हेशन हब' पुण्यात आज सुरू केले आहे. या हबमध्ये १,२०० जण काम करणार आहेत.
अॅसेंचरने यापूर्वी बंगळुरू आणि हैदराबादमध्ये इनोव्हेशन हब सुरू केले आहेत. तर ब्राझीलमधील दोन शहरांत, कॅनडा, चीन, फिनलँड, जपान, स्वित्झर्लँड, ऑस्ट्रेलिया आणि सिंगापूरमध्ये कंपनीचे एक इनोव्हेशन हब आहे.
हेही वाचा-सोने प्रति तोळा होवू शकते ४७,००० हजार रुपये - मोतीलाल ओसवाल
पुण्यातील इनोव्हेशन हब हे एसपी इन्फोसिटीमध्ये आहे. यामध्ये आशिया-प्रशांत (पॅसिफिक) प्रदेशातील दुसरी नॅनो लॅब असणार आहे. या हबमुळे अॅसेंचरच्या ग्राहकांना कृत्रिम मानवी बुद्धिमत्ता, इंटरनेट ऑफ थिंग्ज, ब्लॉकचेन यामधील तज्ज्ञांची सेवा मिळू शकणार आहे. त्यामुळे स्थानिक बुद्धिमत्तेला चालना मिळणार असल्याचे असेंचर टेक्नॉलजी सर्व्हिसचे सीईओ भास्कर घोष यांनी सांगितले.
हेही वाचा-कोरोनाची 'महामारी' झाल्यास जागतिक मंदीचे अरिष्ट येण्याची शक्यता
नॅनॉ लॅबमध्ये कृत्रिम मानवी बुद्धीमत्ता, क्वांटम कॉम्प्युटिंगचा वापर होणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे.