महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

राजकीय पक्षांना कॉर्पोरेट क्षेत्राकडून 93 टक्के देणग्या, 347 देणगीदारांची माहिती गुलदस्त्यात - Bharatiya Janata Party

देशातील सहा राष्ट्रीय पक्षांना 22.59 कोटींच्या 347 देणग्या कॉर्पोरेट कंपन्यांकडून मिळाल्या आहेत. मात्र त्यांचा इंटरनेटवर ठावठिकाणाही नाही. ते काय काम करतात, याबाबत संदिग्धता असल्याचे एडीआरने म्हटले आहे.

संपादित

By

Published : Jul 9, 2019, 3:28 PM IST

नवी दिल्ली - राजकीय पक्षांना सर्वाधिक कॉर्पोरेट क्षेत्राकडून देणग्या देण्यात आल्या आहेत. हे प्रमाण 93 टक्के आहे. देशातील सहा राजकीय पक्षांनी कोट्यवधींची रक्कम कॉर्पोरेट क्षेत्राकडून स्वीकारल्याचे अहवालात म्हटले आहे.

भारतीय जनता पक्षाने देशातील विविध 1 हजार 731 कॉर्पोरेट कंपन्यांकडून 915.59 कोटी रुपये स्वीकारले आहेत. तर देशातील सर्व राजकीय पक्षांना कॉर्पोरेट कंपन्यांकडून 1 हजार 59 कोटी रुपयांची देणगी देण्यात आली आहे. याबाबतचा अहवाल असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्सने (एडीआर) प्रसिद्ध केला. काँग्रेसला विविध 151 कॉर्पोरेटकडून कंपन्यांकडून 55.36 कोटी रुपये मिळाले आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला विविध 23 कॉर्पोरेट क्षेत्रांकडून 7.74 कोटी देणगी मिळाली आहे. सर्वात कमी म्हणजे 2 टक्के देणग्या कम्युनिस्ट पक्षाला (सीपीआय) मिळाल्या आहेत.

राष्ट्रीय पक्षांना विविध 76 संस्थांकडून 2.59 कोटींच्या देणग्या मिळाल्या आहेत. त्यांच्या पॅन क्रमाकांची कोणतीही माहिती उपलब्ध नाही. भाजपला मिळालेल्या 2.50 कोटींच्या देणग्या देणाऱ्यांचे पत्ते आणि पॅन क्रमांक उपलब्ध नाहीत. देशातील सहा राष्ट्रीय पक्षांना 22.59 कोटींच्या 347 देणग्या कॉर्पोरेट कंपन्यांकडून मिळाल्या आहेत. मात्र त्यांचा इंटरनेटवर ठावठिकाणाही नाही. ते काय काम करतात, याबाबत शंका असल्याचे एडीआरने म्हटले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details