महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

प्रतिक्षा संपली! ५जी स्पेक्ट्रमची चाचणी जूनपासून होणार सुरू

'५ जी'च्या चाचणीनंतर दूरसंचार कंपन्यांना स्पेक्ट्रमचे वाटप स्पटेंबरनंतर करण्यात येणार असल्याचे सूत्राने सांगितले.

प्रतिकात्मक

By

Published : May 8, 2019, 6:31 PM IST

नवी दिल्ली - दूरसंचार क्षेत्रात नवी क्रांती ठरू शकणाऱ्या '५ जी' स्पेक्ट्रमची अनेक ग्राहकांना प्रतिक्षा आहे. या '५ जी'ची चाचणी जूनपासून तीन महिन्यांच्या कालावधीसाठी घेण्यात येणार आहे. याबाबतची शिफारस दूरसंचार मंत्रालयाच्या पॅनेलने केली आहे.


एअरटेल, व्होडाफोन आयडिया आणि रिलायन्स जिओला तीन महिन्यांसाठी '५ जी'ची चाचणी घेण्यासाठी परवानगी द्यावी, अशी शिफारस दूरसंचार मंत्रालयाच्या पॅनेलने केली आहे. नेटवर्क स्थिर करण्यासाठी ही मुदत एक वर्षापर्यंत वाढविली जावू शकते.

'५ जी'साठी यंत्रणा पुरविण्याची परवानगी सॅमसंग, नोकिया आणि एरिकसनला देण्यात आल्याची माहिती सूत्राने दिली. '५ जी'च्या चाचणीची परवानगी पुढील १५ दिवसात दिली जाणार आहे. तर दूरसंचार कंपन्या जूनपासून '५ जी'ची सुरुवात करू शकतात.

हूवाईच्या '५ जी'मधील सहभागाबाबत संदिग्धता-
५ जीची चाचणी घेण्यासाठी रिलायन्स जिओची सॅमसंग, नोकियाची एअरटेल आणि व्होडाफोन आयडियाची एरिक्सनबरोबर भागीदारी झाली आहे. चीनची बलाढ्य दूरसंचार कंपनी हूवाई '५ जी' चाचणीत सहभागी होणार आहे की नाही, याबाबत दूरसंचार मंत्रालयाने स्पष्ट केले नाही. '५ जी'च्या चाचणीनंतर दूरसंचार कंपन्यांना सप्टेंबरनंतर स्पेक्ट्रमचे वाटप करण्यात येणार असल्याचे सूत्राने सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details