महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

एअर इंडियाची सेवा दुसऱ्या दिवशीही विस्कळीतच,  १३७ विमान उड्डाणांना उशीर - Alliance Air

एका विमान उड्डाणाला सुमारे १९७ मिनिटे उशीर होत असल्याचे एअर इंडियाच्या प्रवक्त्याने सांगितले आहे.

एअर इंडिया

By

Published : Apr 28, 2019, 6:17 PM IST

नवी दिल्ली- सॉफ्टवेअरमधील तांत्रिक बिघाडानंतर एअर इंडियाच्या विमान उड्डाणांना शनिवारी उशीर झाला होता. एअर इंडियाची विमान सेवा दुसऱ्या दिवशीही विस्कळीतच आहे. १३७ विमान उड्डाणांना आज जवळपास तीन तास उशीर होत आहे.

एका विमान उड्डाणाला सुमारे १९७ मिनिटे उशीर होत असल्याचे एअर इंडियाच्या प्रवक्त्याने सांगितले आहे.

एअर इंडियाच्या विमान सेवेचा खोळंबा-

एअर इंडियाच्या सॉफ्टवेअरमध्ये शनिवारी पहाटे साडेतीन वाजल्यापासून सकाळी साडेआठ वाजेपर्यंत बिघाड झाला होता. त्यानंतर विमान उड्डाणांच्या नियोजित वेळापत्रकात बदल करावा लागला होता. यामुळे एअर इंडियाच्या सुमारे १४९ विमान उड्डाणांना उशीर झाला होता. यामध्ये एअर इंडिया, एअर इंडिया एक्सप्रेस आणि अलायन्स एअरच्या विमानांचाही समावेश आहे. यामुळे हजारो प्रवासी विमानतळावर अडकून पडले होते.

एअरलाईनच्या विमानाची रोज ४७० उड्डाणे होतात. तर एअर इंडिया ग्रुपची एकूण ६७४ फ्लाईट्स आहेत. एअर इंडियाच्या प्रवाशांसाठी सिता (एसआयटीए) हे सर्व्हर आहे. त्याचा जगभरातील विमान वाहतुकीसाठी एअर इंडियाकडून वापर होतो.

ABOUT THE AUTHOR

...view details