महाराष्ट्र

maharashtra

झोमॅटो कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीचे संकट; कंपनीने 'हा' घेतला निर्णय

जे कर्मचारी झोमॅटो कंपनीत राहणार आहेत, त्यांच्या वेतनात जूनपासून कपात होणार आहे. तर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या वेतनात ५० टक्क्यांहून अधिक कपात होणार आहे.

By

Published : May 15, 2020, 5:50 PM IST

Published : May 15, 2020, 5:50 PM IST

प्रतिकात्मक
प्रतिकात्मक

नवी दिल्ली - कोरोनाच्या संकटामुळे झोमॅटोच्या व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे. झोमॅटोचे सीईओ दीपेंद्र गोयल यांनी एकूण मनुष्यबळातील १३ टक्के कर्मचाऱ्यांना नोकरीतून कमी केले जाणार असल्याचे जाहीर केले.

जे कर्मचारी झोमॅटो कंपनीत राहणार आहेत, त्यांच्या वेतनात जूनपासून कपात होणार आहे. तर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या वेतनात ५० टक्क्यांहून अधिक कपात होणार आहे. अधिक वाईट काळासाठी कंपनीने तयार राहायला हवे, असे झोमॅटोचे सीईओ दीपेंद्र गोयल यांनी म्हटले आहे. गेल्या काही महिन्यांत व्यवसाय पूर्णपणे बदलला आहे. हा बदल कायमस्वरुपी राहणार असल्याची शक्यता झोमॅटोच्या सीईओंनी व्यक्त केली आहे.

हेही वाचा-चीनमधून भारतात येणाऱ्या अॅपलला डोनाल्ड ट्रम्प यांनी हा दिला इशारा

ज्या कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले आहे, त्यांच्याशी झूम व्हिडिओ कॉलद्वारे संपर्कात राहणार असल्याचे गोयल यांनी सांगितले. त्यांना लवकरात लवकर नोकरी मिळण्यासाठी मदत करणार असल्याचेही गोयल यांनी म्हटले आहे.

हेही वाचा-कृषी उद्योगाला तत्काळ १ लाख कोटींचे पॅकेज जाहीर

ABOUT THE AUTHOR

...view details