नवी दिल्ली - घरपोहोच अन्न देणाऱ्या झोमॅटोने 'फीडिंग इंडिया' या समाजसेवी स्टार्टअपचे अधिग्रहण केले आहे. हे अॅप सामाजिक उद्देश ठेवून गरीबांना अन्न देण्याचे काम करत आहे. यापुढे फीडिंग इंडियाच्या सर्व कर्मचाऱ्यांच्या पगारी आणि काही उपक्रमांचा सर्व खर्च झोमॅटोकडून केला जाणार आहे.
लाखो गरिबांना अन्नदान देणाऱ्या स्टार्टअपचे झोमॅटोकडून अधिग्रहण - Feeding India
झोमॅटो हे अन्नदान करणारे आणि स्वयंसेवकांना जोडणारे अॅप विकसित करणार आहे. फीडिंग इंडियाच्या वेबसाईटमध्ये सुधारणा करण्यात येणार आहेत.
झोमॅटो हे अन्नदान करणारे आणि स्वयंसेवकांना जोडणारे अॅप विकसित करणार आहे. फीडिंग इंडियाच्या वेबसाईटमध्ये सुधारणा करण्यात येणार आहेत. झोमॅटो हे जागतिक अन्नपुरवठा वित्तीय पारदर्शकतेचा अहवाल पहिल्यांदाच ऑक्टोबर २०१९ पासून प्रसिद्ध करणार आहे. याबाबतची माहिती झोमॅटोचे संस्थापक आणि सीईओ दिपींद्र गोयल यांनी ब्लॉगमध्ये दिली आहे. गेल्या सहा महिन्यांपासून फीडिंग इंडियाचा गट हा झोमॅटोबरोबर काम करत आहे.
फीडिंग इंडियाने डिसेंबर २०१८ मध्ये ७८ हजार ३०० जणांना अन्नाचे वाटप केले. तर दर महिन्याला १० लाख १० हजार गरिबांना अन्नाचे वाटप केले जात असल्याचे गोयल यांनी ब्लॉगमध्ये म्हटले आहे. तसेच फीडिंग इंडियाचा उपक्रम हा ६५ शहरांतून विस्तारत ८२ शहरात राबविण्यात येत आहे. तर हंगर हिरोज (फीडिंग इंडियाचे स्वयंसेवक) यांची संख्या ८ हजार ५०० वरून २१ हजार ५०० एवढी झाली आहे.