महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

'गुगल पे'सारख्या अ‌ॅपवरून होणाऱ्या आर्थिक व्यवहारावरील शुल्क माफ - यूपीआय

नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने यूपीआय इंटरचेंज आणि पेमेंट सेवा पुरवठादार (पीएसपी) यांचे शुल्क शून्य करणार असल्याचे जाहीर केले आहे. अधिसूचनेनुसार ३० एप्रिल २०२० पर्यंत तात्पुरते शुल्क रद्द करण्यात येणार आहे.

Google Pay
गुगल पे

By

Published : Feb 21, 2020, 5:43 PM IST

नवी दिल्ली- 'गुगल पे'सारख्या यूपीआय इंटरचेंज सेवा देणाऱ्या कंपन्यांना ग्राहकांच्या व्यवहारांवर शुल्क आकारता येणार नाही. याविषयीची नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने अधिसूचना काढली आहे.

नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने यूपीआय इंटरचेंज आणि पेमेंट सेवा पुरवठादार (पीएसपी) यांचे शुल्क शून्य करणार असल्याचे जाहीर केले आहे. अधिसूचनेनुसार ३० एप्रिल २०२० पर्यंत तात्पुरते शुल्क रद्द करण्यात येणार आहे. मात्र, ईएमआय, ओव्हरड्राफ्ट आणि बिझनेस टू बिझनेसच्या (बी२बी) व्यवहाराचे शुल्क माफ करता येणार नाही. यापूर्वी एमडीआरवरील शुल्क माफ करण्यात आले आहे.

संबंधित बातमी वाचा-खूशखबर! रुपेसह यूपीआयचा वापर केल्यास 'हे' लागणार नाही शुल्क

बँकांना रुपे डेबिट कार्ड आणि यूपीआय व्यवहारांसाठी एमडीआरचे शु्ल्क आकारता येत नाही. मात्र, याचा परिणाम फोन पे, गुगल पे आणि अ‌ॅमेझॉन पेच्या महसुलावर होणार आहे. यूपीआयच्या व्यवहारामधून कंपन्या सुमारे ०.३० ते ०.३५ टक्के शुल्क आकारतात.

हेही वाचा-कोरोनाचा परिणाम : टिव्हीच्या किमती मार्चपासून १० टक्क्यांनी वाढण्याची शक्यता

डिजीटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी २८ डिसेंबर २०१९ ला महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. रुपे आणि यूपीआयचा वापर केल्यास एमडीआरचे शुल्क १ जानेवारी २०२० पासून आकारण्यात येणार नाही, असे म्हटले होते.

ABOUT THE AUTHOR

...view details