महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

व्हिडिओची सत्यता कळण्यासाठी युट्युबवर 'हे' येणार फीचर

भारतामध्ये सर्वात कमी डाटा प्लॅन असल्याने युट्युबची सर्वात मोठी बाजारपेठ आहे. भारतात २.५ कोटी लोक युट्युब वापरत आहेत. त्यामुळे या फीर्चसची तपासणी हिंदीसह इंग्रजीतही घेतली जाणार आहे.

रेपो दर

By

Published : Mar 9, 2019, 5:16 PM IST

सॅन फ्रान्सिस्को- युट्यूब हे लवकरच पॉपअपचे फीचर उपलब्ध करून देणार आहे. या फीचर्समुळे युट्युब वापरकर्त्यांना संवदेनशील माहिती सर्च करताना वस्तुस्थिती कळणे शक्य होणार आहे.

युट्युबवरील फॅक्ट चेकच्या फीचरमधून वापरकर्त्यांना संबंधित विषयावरील माहिती इतर प्लॅटफॉर्मवर दिसणार आहे. तसेच सर्चमध्ये इतर विषयांचे पर्याय दाखविण्यात येणार आहे. तरीही चुकीचा व्हिडिओ दाखविण्यात येत असेल तर युट्युबवर चुकीची माहिती पसरू नये, यासाठी अस्वीकृतचा (Disclaimer) संदेश दाखविणार आहे.

भारत युट्युबची सर्वात मोठी बाजारपेठ -

भारतामध्ये सर्वात कमी डाटा प्लॅन असल्याने युट्युबची सर्वात मोठी बाजारपेठ आहे. भारतात २.५ कोटी लोक युट्युब वापरत आहेत. त्यामुळे या फीर्चसची तपासणी हिंदीसह इंग्रजीतही घेतली जाणार आहे. युट्युबवर सत्य बातम्या दाखविल्या जाव्यात यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. त्याच प्रक्रियेचा भाग म्हणून हे फीचर देत असल्याचे युट्युबच्या प्रवक्त्याने सांगितले.

सत्य माहिती देणारेच व्हिडिओ दिसावेत, यासाठी युट्य़ुब हे सहाहून अधिक सेवा इतर कंपन्यांकडून घेणार आहे. यामधील काही सेवा या फेसबुकबरोबर काम करत आहेत. निवडणुकीच्या तोंडावर सोशल मीडियाचा वापर कोणतीही चुकीची माहिती पसरविण्यासाठी होऊ नये, अशी ताकद केंद्र सरकारने यापूर्वी कंपन्यांना दिली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details