महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

एका बिटकॉईनवर खरेदी करता येणार टेस्ला; एलॉन मस्क यांची घोषणा - Long Range starts

सध्या एका बिटकॉईनची किंमत सुमारे ५६,००० हजार डॉलर आहे. याचा अर्थ एका बिटकॉईनवर टेस्लामधील सुरुवातीच्या टप्प्यातील कार ग्राहकांना खरेदी करता येणे शक्य आहे.

Elon Musk
एलॉन मस्क

By

Published : Mar 24, 2021, 7:05 PM IST

सॅन फ्रान्सिस्को- टेस्लाचे सीईओ एलॉन मस्क यांनी इलेक्ट्रिक कारच्या खरेदीबाबत महत्त्वाची घोषणा केली आहे. अमेरिकेतील ग्राहकांना टेस्ला कार ही बिटकॉईननेही खरेदी करणार असल्याचे मस्क यांनी जाहीर केले आहे. तर इतर देशांमध्येही बिटकॉईनने टेस्ला खरेदी करण्याचा पर्याय सुरू होणार असल्याचे म्हटले आहे.

सध्या एका बिटकॉईनची किंमत सुमारे ५६,००० हजार डॉलर आहे. याचा अर्थ एका बिटकॉईनवर टेस्लामधील सुरुवातीच्या टप्प्यातील कार ग्राहकांना खरेदी करता येणे शक्य आहे.

हेही वाचा-इंडिगोकडून टाळेबंदीत उड्डाणे रद्द झाल्यानंतर १,०३० कोटी रुपये प्रवाशांना परत

महिनाभरापूर्वी टेस्लाने बिटकॉईनचे पैसे स्वीकारण्यास सुरुवात केल्याचे जाहीर केले होते. टेस्लाने बिटकॉईनमध्ये १.५ अब्ज डॉलरची गुंतवणूक केली होती.

एलॉन मस्क ट्विट
  • टेस्लामधील सुरुवातीच्या टप्प्यात असलेले मॉडेल ३ स्टँडर्ड रेंज प्लसची किंमत ही ३७,९९० डॉलरपासून पुढे आहे. तर लाँग रेंजची किंमत ४६,९९० डॉलरहून पुढे आहे. तर टेस्लामधील आघाडीच्या मॉडेलची किंमत ५४,९९० डॉलरहून अधिक आहे.
  • तुम्ही एका बिटकॉईनमध्ये टेस्ला घेऊ शकता, असे मस्क यांनी ट्विट केले आहे. डॉगी या क्रिप्टोचलनाना पाठिंबा देणारे ट्विटही मस्क यांनी केले आहे.
  • ग्राहकांना बिटकॉईनमधून टेस्लाची खरेदी करण्यासाठी टेस्लाच्या वेबसाईटवर पर्याय देण्यात येणार आहे. वापरकर्त्यांना क्यूआर कोड स्कॅन करून अथवा बिटकॉईन वॉलेटचा वापर करून ग्राहकांना हा व्यवहार करता येणार आहे.
  • टेस्लाच्या खरेदीसाठी बिटकॉईनच्या मुल्यासाठी अमेरिकन डॉलरमधील किंमत गृहित धरण्यात येणार आहे.

हेही वाचा-सोन्याच्या दरात प्रति तोळा १४९ रुपयांची घसरण; चांदीचे दरही उतरले!

दरम्यान, एलॉन मस्क यांनी भारतामध्ये बंगळुरूमध्ये मुख्य कार्यालयाची नोंदणी केली आहे. एलॉन मस्क हे इलेक्ट्रिक सीडान लाँच करणार असल्याची चर्चा आहे. या इलेक्ट्रिक कारची भारतात सुमारे ६० लाख रुपये किंमत असणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details