नवी दिल्ली - बँकेच्या आर्थिक स्थितीबाबत खोट्या बातम्या आणि अफवा पसरविल्या जात असल्याची येस बँकेने मुंबई पोलिसात आणि सायबर सेलमध्ये तक्रार केली. आर्थिक स्थिती सदृढ आणि सुरक्षित असल्याचे येस बँकेने म्हटले आहे.
येस बँकेच्या प्रवर्तकांनी बँकेतील हिस्सा कमी केला आहे. त्यानंतर गेली काही दिवस बँकेच्या शेअरमध्ये कमालीची घसरण झाली आहे. अशा स्थितीत येस बँकेने व्हॉट्सअॅपसह इतर समाज माध्यमातून पसरविण्यात येणाऱ्या अफवाविरोधात मुंबई पोलिसात तक्रार दिली आहे. याची माहिती बँकेने शेअर बाजाराला दिली आहे. खोट्या बातम्या शोधून काढण्यासाठी तज्ज्ञांचे पथक असावे, अशी विनंतीही बँकेने सायबर सेलला केली आहे.
हेही वाचा-सणासुदीला ग्राहकांना दिलासा; पेट्रोल-डिझेलच्या दरात सलग पाचव्या दिवशी कपात