नवी दिल्ली– कोरोना महामारीत पर्यटन व आदरातिथ्य उद्योग संकटात असताना यात्रा डॉट कॉमने अॅमेझॉन बिझनेसबरोबर भागीदारी केली आहे. त्यामधून आदरातिथ्य क्षेत्रातील भागीदारांना विविध श्रेणीतील उत्पादने ऑनलाईन उपलब्ध होणार आहेत.
यात्रा कंपनीच्या भागीदारांना व्यवसायासाठी लागणाऱ्या उत्पादनांच्या खरेदीवर अॅमेझॉन बिझनेसवरून मोठ्या सवलती मिळणार आहेत. तसेच मोठ्या जीएसटी बिलांवर सवलती मिलणार आहेत. तसेच कर वजावटीसाठी इनपुट टॅक्स क्रेडिटसाठी दावाही करता येणार आहे.
यात्रा डॉट कॉमचे सहसंस्थापक आणि सीईओ ध्रुव शृंगी म्हणाले, की अॅमेझॉन बिझनेसबरोबर भागीदारी करण्याची घोषणा करताना आम्हाला आनंद होत आहे. त्यामुळे आदरातिथ्य भागीदारांना रोज व महिन्याला लागणाऱ्या उत्पादनांच्या खरेदीसाठी मदत होणार आहे. या भागीदारीमागे 1 लाख 8 हजार हॉटेलला विक्रीचे एक दुकान उपलब्ध करून देणे हा उद्देश आहे. आदरातिथ्य क्षेत्रातील भागीदारांना किचन अप्लायन्सेस, डेकोर, ऑफिससाठी लागणाऱ्या वस्तू अशा विविध वस्तू खरेदीसाठी उपलब्ध होणार आहेत.
दरम्यान, कोरोना महामारीत ऑनलाईन प्रवासी कंपन्यांचे व्यवहार विस्कळित झाले आहेत.