नवी दिल्ली -किरकोळ बाजारपेठेबरोबरच घाऊक बाजारपेठेतही महागाई वाढल्याचे समोर आले आहे. घाऊक महागाई निर्देशांकात फेब्रुवारीत २.९३ टक्के वाढ झाली आहे.
जानेवारी २०१९ मध्ये घाऊक महागाई निर्देशांक हा २.७६ टक्के होता. घाऊक महागाई निर्देशांक हा फेब्रुवारी २०१८ मध्ये २.७४ टक्के होता. महागाई वाढल्याने बटाटे, कांदे, फळे आणि दूध यांच्याकिंमती ४.८४ टक्क्यापर्यंत वाढल्याआहेत. जानेवारीत या किंमती ३.५४ टक्क्यापर्यंत वाढल्याचे आकडेवारीतून समोर आले आहे. घाऊक महागाई निर्देशांकाच्या आकडेवारीत इंधन आणि विद्युत उर्जेच्या किंमतीही २.२३ टक्क्याने वाढल्या आहेत. या किंमती १.८५ टक्के जानेवारी २०१९ मध्ये वाढल्या आहेत.