नवी दिल्ली - अमेरिका-चीन या दोन महासत्तामधील व्यापारी युद्ध पुन्हा एकदा पेटले आहे. याचा परिणाम आंतरराष्ट्री बाजारावर ३२ टक्क्यांहून अधिक परिणाम झाला आहे. त्याचे पडसाद स्थानिक बाजारावरही परिणाम होत आहे.
अमेरिका-चीनच्या व्यापारी युद्धाचा भारतीय कापूस बाजारपेठेवर खूप परिणाम होत आहे.
सर्वात अधिक कापसाचे उत्पादन भारतात-
अमेरिका हा कापूस निर्यात करणारा जगातील सर्वात मोठा देश आहे. चीन हा कापूस आयात करणारा देश आहे. दोन्ही देशातील व्यावसायिक ताणलेले संबंधाने जगभरातील कापूस बाजारपेठेवर परिणाम होत आहे. त्याचा भारतावर परिणाम होत आहे. भारतामध्ये जगात सर्वात अधिक कापसाचे उत्पादन घेण्यात जात असल्याचे डीडी कॉटन प्रायव्हेटचे संचालक अरुण शेखसरिया यांनी सांगितले.
अमेरिका-चीनच्या व्यापारी युद्धाचा फटका ; कापसाचे भाव १६ टक्क्यांनी कोसळण्याची शक्यता
अमेरिका-चीनच्या व्यापारी युद्धाचा भारतीय कापूस बाजारपेठेवर खूप परिणाम होत आहे.
जागतिक कापसाच्या बाजारपेठेत सुधारणा होण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे भारतीय बाजारातही कापसाचे भाव आणखी घसरण्याची शक्यता असल्याचे राजा एकस्पोर्टस प्रायव्हेट कंपनीचे दिलीप पटेल यांनी सांगितले.
केंद्र सरकारने कापसाचा प्रति क्विटंल भाव ५ हजार २५५ रुपये व ५ हजार ५५० रुपये निश्चित केला आहे. भाव कोसळत असल्याने कापूस उत्पादक चिंतेत आहेत. कापसाचे भाव कमी होत राहिले तर भारतीय कापूस महामंडळाने कापसाची अधिक हमीभावाने खरेदी करावी, अशी अपेक्षा सालसार बालाजी अॅग्रोटेकचे शिवराज खैतान यांनी केली.