मुंबई -पर्यटन क्षेत्र हे संस्कृती टिकविणे आणि वारसा जपण्यासाठी जगभरात महत्त्वाची भूमिका पार पडते. संयुक्त राष्ट्रसंघाच्या जागतिक पर्यटन संस्थेकडून दरवर्षी २७ सप्टेंबरला जागतिक पर्यटन दिन साजरा करण्यात येतो.
पर्यटन क्षेत्राचे जागतिक स्तरावर महत्त्व कळावे, यासाठी जागतिक पर्यटन दिन साजरा करण्यात येतो. पर्यटन क्षेत्राकडून जागतिक विकास आणि संस्कृतीच्या प्रगतीसाठी मोठ्या प्रमाणात योगदान देण्यात येते. कोरोनाच्या संकटात पर्यटन क्षेत्राच्या भविष्याबाबत पुनर्विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे.
पर्यटन दिनाचा इतिहास
इंटरनॅशनल युनियन ऑफ ऑफिशियल ट्रॅव्हल ऑरगायनेझेशनने (आययूओटीओ) २७ सप्टेंबर १९७० ला विशेष अधिवेशन मेक्सिकोमध्ये बोलाविले होते. या अधिवेशनात जागतिक पर्यटनाची स्थापना करण्यात आली. त्यानंतर संयुक्त राष्ट्रसंघाच्या पर्यटन संस्थेने सप्टेंबर १९७९ ला जागतिक पर्यटन दिन साजरा करण्याचे जाहीर केले आहे. जगभरात पहिल्यांदा २७ सप्टेंबर १९७० ला जागतिक पर्यटन दिन साजरा करण्यात आला.
हेही वाचा-कोरोनाच्या लसीकरता सरकारकडे ८० हजार कोटी रुपये आहेत का?
पर्यटन क्षेत्राचे रोजगारात योगदान
⦁ संयुक्त राष्ट्रसंघ जागतिक पर्यटन संस्थेच्या अंदाजानुसार जगभरातील पर्यटकांच्या भ्रमंतीत ५८ ते ७८ टक्के घट होण्याचा अंदाज आहे.