महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

जागतिक बँकेचा भारताला मदतीचा हात; एवढे देणार अर्थसहाय्य - social protection package for India

जागतिक बँकेने केंद्र सरकारकडून सामाजिक संरक्षणासाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांसाठी मदतनिधी जाहीर केला आहे.

प्रतिकात्मक
प्रतिकात्मक

By

Published : May 15, 2020, 11:43 AM IST

नवी दिल्ली- कोरोना महामारीचे संकट आणि टाळेबंदीने देशाची अर्थव्यवस्था ढासळत असताना जागतिक बँकेने भारतासाठी मोठा दिलासादायक निर्णय घेतला आहे. जागतिक बँक भारताला १ अब्ज डॉलरची मदत करणार आहे.

जागतिक बँकेने केंद्र सरकारकडून सामाजिक संरक्षणासाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांसाठी मदतनिधी जाहीर केला आहे. कोरोनामुळे देशातील स्थलांतरित मजूर, शेतकरी, गरीब, मध्यमवर्गीय, कामगार हे आर्थिक संकटात सापडले आहेत. देशातील अर्थव्यवस्थेला चालना देणे व गरीब घटकांच्या मदतीसाठी केंद्र सरकारने एकूण २० लाख कोटींचे पॅकेज जाहीर केले आहे.

संबंधित बातमी वाचा-अर्थमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेमधील ठळक मुद्दे.. लघुकुटीर उद्योगांसाठी सहा मोठ्या तरतूदी!

यापूर्वी एशियन डेव्हलपमेंट बँकेने (एडीबी) १.५ अब्ज डॉलरचे कर्ज भारताला मंजूर केले आहे. कोरोनाच्या संकटात भारताला लढण्यासाठी हे कर्ज देण्यात येणार आहे.

हेही वाचा-सीबीआयला मोठे यश; विजय मल्ल्याचे इंग्लंडच्या सर्वोच्च न्यायालयाने फेटाळले अपील

ABOUT THE AUTHOR

...view details