नवी दिल्ली - केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्रालयाने सेवा क्षेत्राशी संबंधित स्थायी आदेशाचा मसुदा जाहीर केला आहे. यामध्ये घरातून काम (वर्क फ्रॉम होम), निश्चित रोजगार आणि इतरांचा समावेश आहे.
केंद्र सरकारने उत्पादन क्षेत्र, खाणकाम आणि सेवा क्षेत्राशी संबंधित स्थायी आदेशाचा मसुदा हा राजपत्रात प्रसिद्ध केला आहे. या मसुद्याशी संबंधित लोकांना ३० दिवसांत सूचना आणि आक्षेप मागविले आहेत.
सेवा क्षेत्रासाठी पहिल्यांदाच स्वतंत्र मॉडेल-
सेवा क्षेत्राची गरज लक्षात घेऊन स्थायी आदेशाचे स्वतंत्र मॉडेल पहिल्यांदा तयार केले आहे. कामगार विभागाचे माजी आयुक्त डॉ. के. के. एच. एम. श्यामसुंदर म्हणाले की, कार्यालयाच्या बाहेरून काम करणे हे कर्मचारी आणि कंपन्यांमध्ये वादाचे कारण ठरत आहे. त्यामध्ये कामाचे तास व उत्पादकता यांचा समावेश आहे. जर या मार्गदर्शक सूचना लागू झाल्या तर वादावर तोडगा निघू शकणारी यंत्रणा अस्तित्वात येणार आहे.