मुंबई- 'राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल २०१९-२०' विधानसभेत सादर केल्यानंतर राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी चिंता व्यक्त केली आहे. महाविकास आघाडी राज्याला आर्थिकबाबतीत पुन्हा एकदा अव्वल करणार असल्याचे अर्थमंत्री पवार यांनी गुरुवारी सांगितले.
राज्याची उद्योग आणि सेवा क्षेत्रात पिछेहाट झाल्याचे आर्थिक पाहणी अहवालामधून समोर आले आहे. यावर प्रतिक्रिया देताना अजित पवार म्हणाले, फडणवीस सरकारच्या पाच वर्षांच्या काळात राज्याच्या बेरोजगारीची स्थिती खूप खराब झाली आहे. हा सर्व चुकीच्या धोरणाचा परिणाम आहे. शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेसची सत्ता नोव्हेंबर २०१९ मध्ये आली आहे. हे सरकार चुका दुरुस्त करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.