नवी दिल्ली - घाऊक बाजारपेठेतील महागाईत जानेवारीत वाढ झाली आहे. घाऊक बाजारपेठेत महागाई निर्देशांक जानेवारीदरम्यान ३.१ टक्के राहिला आहे. तर मागील महिन्यात डिसेंबर २०१९ मध्ये महागाईचा दर २.५९ टक्के होता.
मागील वर्षात जानेवारीदरम्यान महागाईचा दर हा २.७६ टक्के होता. चालू आर्थिक वर्षात महागाईचा दर हा २.५० टक्के राहिला आहे. तर गेल्या आर्थिक वर्षात महागाईचा दर हा २.४९ टक्के होता. जानेवारीमधील अन्न वर्गवारीच्या महागाईचा दर हा डिसेंबरच्या तुलनेत १ टक्क्यांनी कमी झाला आहे.