नवी दिल्ली - फेसबुकची मालकी असलेले व्हॉट्सअप वापरकर्त्यांचे काम सोपे होण्यासाठी नेहमीच नवीन फिचर सुरू करते. व्हॉट्सअप मेसेज एकवेळच पाहणारे व्ह्यूव वन्स (View Once) हे फीचर सुरू करणार आहे.
व्ह्यूव वन्स हे फीचर सुरू होणार असल्याची माहिती फेसबुकचे संस्थापक मार्क झुकेरबर्ग आणि विल कॅथकार्ट यांनी एका माध्यमाला दिली आहे. हे फीचर लवकरच व्हॉट्सअप सुरू करणार आहे.
हे वाचा-सैन्यदलाकडून ड्रोन हल्ल्याविरोधात क्षमता विकसित करण्याचे काम सुरू - सी. एम. नरवणे
काय आहे फीचर?
- व्ह्यूव वन्स फीचरमध्ये तुम्हाला फोटो आणि व्हिडिओ पाठवू शकता.
- त्यामधून एकवेळच फोटो आणि व्हिडिओ दिसू शकतात.
- हा मेसेज फोटो आणि व्हिडिओ पाहण्यापूर्वी वापरकर्त्याला तशी सूचना दिली जाते.
- त्यानंतर वापरकर्त्याने फोटो व व्हिडिओ पाहिला की मेसेज अदृश्य होतो.
हे वाचा-Gulshan Kumar Murder अब्दुल रौफची जन्मठेप कायम, राशिदची मात्र मुक्तता
जर तुम्ही रीड रिसीप्ट बंद केले तर मेसेज ज्याला पाठविले आहे, असा व्यक्ती हा फोटो आणि व्हिडिओ पाहू शकणार आहे. मात्र, तुम्हाला ते फोटो आणि व्हिडिओ दिसू शकणार नाहीत. ग्रुपमध्येही अशाच पद्धतीने फीचर काम करणार आहे.
फोटो व व्हिडिओ अदृश्य झाले तर फोल्डरमध्ये राहू शकतात जतन
व्हिव्यू वन्समध्ये वापरकर्ते हे फोटो व व्हिडिओ जतन करू शकतात. तसेच त्याचा स्क्रीनशॉटही काढू शकतात. व्हॉट्सअपमध्ये स्क्रीनशॉट डिटेक्शन नसल्याने स्क्रीनशॉट काढण्यात आल्याची सूचना वापरकर्त्याला मिळत नाही. हे फीचर केवळ अँड्राईड बिटा टेस्टर्ससाठी उपलब्ध आहे. आयओएस बीटा टेस्टर्ससाठी ही फीचर पुन्हा सुरू होणार आहे.
गोपनीयतेच्या धोरणावरून व्हॉट्सअप आहे अडचणीत-
भारतीय स्पर्धा आयोगाने (सीसीआय) ४ जूनला व्हॉट्सअप आणि फेसबुकला पाठवून गोपनीयतेच्या धोरणाबाबत विचारणा केली होती. या नोटीसला व्हॉट्सअप आणि फेसबुकने दिल्ली उच्च न्यायालयात ४ जूनला आव्हान दिले आहे. पुढील सुनावणी होईपर्यंत कोणतीही उपाययोजनात्मक कारवाई होऊ नये, असे यंत्रणेला आदेश द्यावे, अशी सोशल मीडिया कंपनीने दिल्ली उच्च न्यायालयातील याचिकेत विनंती केली आहे. दोन्ही बाजुंचे म्हणणे ऐकल्यानंतर सुट्टीकालीन खंडपीठाचे न्यायमूर्ती अनुप जयराम भाम्भानी आणि न्यायमूर्ती जसमीत सिंह यांनी आदेश राखीव ठेवला आहे.