ATM कार्ड हरवलेय? ...अशा प्रकारे करा त्वरित ब्लॉक - atm block
आजच्या काळात एटीएम दैनंदिन जीवनाचा महत्वाचा भाग झाला आहे. आपल्यापैकी बहुतांश लोक एटीएम वापरत असणार. शॉपिंग पासून ते इलेक्ट्रीक बिल प्रत्येक गोष्टींसाठी आजकाल एटीएमच्या सहाय्याने पेमेंट करण्यात येते. जर चुकीने तुमचे एटीएम कार्ड हरवले तर काय होणार? हा विचार केला तर पायाखालची वाळूच सरकली असेल ना?
टेक डेस्क - आजच्या काळात एटीएम दैनंदिन जीवनाचा महत्वाचा भाग झाला आहे. आपल्यापैकी बहुतांश लोक एटीएम वापरत असणार. शॉपिंग पासून ते इलेक्ट्रीक बिल प्रत्येक गोष्टींसाठी आजकाल एटीएमच्या सहाय्याने पेमेंट करण्यात येते. जर चुकीने तुमचे एटीएम कार्ड हरवले तर काय होणार? हा विचार केला तर पायाखालची वाळूच सरकली असेल ना?
तुम्हाला विचार येत असेल की जर कोणी खात्यातून पूर्ण पैसे काढून घेतले तर. मात्र घाबरण्याचे कारण नाही. तुम्ही तुमचे एटीएम कार्ड काही वेळात ब्लाक करुन पुढील अनर्थ टाळू शकता. एटीएम कार्ड ब्लाक करण्यासाठी तुमचे इंटरनेट बँकिंग अॅक्टिव्ह असणे गरजेचे आहे. तुमच्या इंटरनेट बँकिंगच्या आयडी आणि पासवर्डने लाग-इन करा. त्यानंतर ATM service मध्ये जा. येथे block ATM Card चा विकल्प निवडा. आता तुमचे एटीएम स्क्रिनमध्ये तुम्हाला दिसेल. त्यामध्ये एटीएम डेबिट कार्ड हा विकल्प निवडा.
त्यानंतर तुम्हाला एटीएम कार्डशी संबंधित काही प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील. उत्तर दिल्यानंतर सबमिट बटनवर क्लिक करा. यानंतर रजिस्टर्ड मोबाईल नंबर वर ओटीपी येणार. ओटीपी टाकल्यावर तुमचे कार्ड ब्लॉक होणार. एटीएम कार्ड ब्लॉक झाल्यावर तुम्हाला कन्फर्मेशन मॅसेजही येणार. तुम्ही तुमच्या बँकेला ईमेल पाठवूनही कार्ड ब्लॉक करू शकता.